Mumbai-Pune Expressway x
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway : नवरात्रीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत बदल, वाचा पर्यायी मार्ग

Mumbai-Pune Expressway News : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने जुन्या मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Yash Shirke

  • नवरात्रौत्सवात मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतुकीत बदल.

  • कार्ला एकविरा देवी मंदिर परिसरात अवजड वाहनांना नो एंट्री.

  • पर्यायी मार्गाने जड वाहने एक्सप्रेसवेवर वळवली जाणार.

पुणे : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत, सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

- दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कार्ला फाटा ते श्री. एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

- दि. २७ सप्टेंबर २०२५ ते दि. ०१ ऑक्टोबर २०२५ सकाळी ०६.०० ते रात्री २२.०० या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध (No Entry) राहील.

जुना मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने ही लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील. पुणे-मुंबईकडे जाणारी जड व अवजड वाहने ही वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.

एकविरा देवी हे पुण्यातील जागृत देवस्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. नवरात्रौत्सवामध्ये भाविकांची संख्या दुपट्टीने वाढते. दरवर्षी नवरात्र उत्सवादरम्यान एकविरा देवी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ (दि. २२ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५) यादरम्यानही मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफी कधी होणार? दत्ता भरणेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेत थेट उत्तरच सांगितलं, म्हणाले...VIDEO

Aluchi Bhaji : पालक शेपू कशाला? अळूची गावरान भाजी एकदा नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: राजकारणात मला यायचं नव्हतं मुंडे साहेबांनी मला यात आणलं- पंकजा मुंडे

Fast Weight Loss: वजन कमी करायचं आहे? पण, हेवी डाईट नको; मग फॉलो करा या ६ सोप्या टिप्स

India Tourism: सोलनपासून हाकेच्या अतंरावर आहे स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, ठिकाण पाहून मंत्रमुग्ध व्हाल

SCROLL FOR NEXT