Maharashtra Politics : अजित पवारांकडून स्वबळाचे संकेत, पुण्यात महायुतीमध्ये फूट पडणार?

Maharashtra Political News : अजित पवार सध्या पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत.

  • त्यांनी विकास कामासाठी स्वबळावर उमेदवार लढवण्याचे आवाहन केले.

  • त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत चर्चेला गती मिळाली आहे.

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. कालपासून पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात त्यांचा दौरा सुरु आहे. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोर्चेबांधणी करत असल्याचे म्हटले जात आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'पिंपरी-चिंचवड शहरातील विकास काम खूप मोठं आहे. शहरातील विकास काम करण्यासाठीची क्षमता आणि ताकद आमच्यामध्ये आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मी दिलेल्या उमेदवाराच्या पाठिशी तुम्ही उभे राहा आणि त्यांना निवडून द्या', असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी -चिंचवड शहरातील मतदारांना केला आहे.

Maharashtra Politics
Shocking : ३ वर्षांपासून प्रेमसंबंध! तरुणानं काकीशी थेट पोलीस ठाण्यात केलं लग्न, दोघांचा 'तो' Video Viral

'पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाठी राज्य आणि केंद्र सरकारची मदत कशी घ्यायची हे आम्हाला चांगलच माहीत आहे. तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या', असे म्हणत अजित पवार यांनी एका प्रकारे पिंपरी-चिंचवड शहरात स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा महायुतीतील घटक पक्षांना दिला आहे अशी चर्चा रंगली आहे.

Maharashtra Politics
Dharashiv : छमछम बंद होणार? उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येनंतर कलाकेंद्र विरोधात पोलिसांची धडक कारवाई

अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहर हा बालेकिल्ला समजला जातो. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात भेटीगाठींचा धडाका लावला आहे. यामुळे अजित पवार हे महायुतीत असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरात स्वबळावर निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Politics
Video : शिक्षिकेच्या बदलीने गावाला गहिवरून आले, चिमुकले कोपऱ्यात बसून रडले; पालक-आजोबांचा कंठ दाटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com