Mumbai Pune Expressway  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार, २५ मिनिटांचा वेळ वाचणार, केबल स्टे ब्रिज नेमका कुठे उभारलाय?

Mumbai Pune expressway missing link latest update : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पात सह्याद्री पर्वतरांगेत उभारण्यात आलेल्या १८२ मीटर उंच केबल स्टे ब्रिजचे काम ९५% पूर्ण झाले आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai–Pune Expressway Missing Link Update: मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. याचं काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झालेय. एप्रिल २०२६ पर्यंत हा केबल स्टे ब्रिज (Opening date of Mumbai Pune missing link cable bridge) खुला होण्याची शक्यता आहे. हा ब्रिज सुरू झाल्यास दोन शहरातील प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होणार आहे. दोन बोगदे आणि दोन पुलांसह हा भव्य प्रकल्प वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सध्या मिसिंग लिंकचे काम जोरात सुरू आहे. त्याअंतर्गत साह्याद्रीच्या पर्वतरांगेत केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. १८२ मीटर उंच असणारा या ब्रिजचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत या केबल स्टे ब्रिजच्या बांधकामात जोरदार वारे, धुके आणि पावसाचे मोठे आव्हान होते. याचे काम सुरू करण्यापूर्वी MSRDC प्रशासनाला वाऱ्याचा वेग कमी होण्याची आणि धुके कमी होण्याची दररोज वाट पहावी लागत आहे.

MSRDC कडून दोन डोंगरामध्ये केबल-स्टेड पूल उभारला जात आहे. याचे काम फक्त ५ टक्के राहिलेय. हा ब्रिज खुला झाल्यास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. १८२ मीटर उंचीच्या या पुलावरील वाहने १३२ मीटर उंची ओलांडून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जातील. त्यामुळे सहा कमी अंतर कमी होणार आहे. यामुळे वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. घाटातून प्रवास करण्याची गरजही भासणार नाही.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचे खोपोली एक्झिट आणि सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान सध्या १९ किमी अंतर आहे. मिसिंग लिंकच्या बांधकामामुळे हे अंतर १३.३ किमीपर्यंत कमी होईल. या प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन केबल पूल बांधण्यात आलेत. १३.३३ किमी पैकी बोगदा ११ किमी लांब असेल आणि केबल पूल अंदाजे २ किमी लांब आहे. ८५० मीटर लांब आणि २६ मीटर रुंद असलेले हे दोन केबल पूल दोन टप्प्यात बांधले जात आहेत. बोगद्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, तर केबल पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती MSRDC च्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उभारण्यात येत असलेला हा केबल-स्टेड पूल वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा ५५ मीटर उंच आहे. सी लिंकचा केबल ब्रिज १२८ मीटर उंच आहे. ब्रिजचे खांब उभारण्यासाठी चार १८२ मीटर टॉवर क्रेनचा वापर करण्यात आला. वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन या ब्रिजची रचना करण्यात आली. या ब्रिजवरून वाहने १०० किमी वेगाने धावतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा ब्रिज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांच्या घरी मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, बंदोबस्त वाढवला VIDEO

New Year Resolution 2026: नवीन वर्षात, नवीन सुरूवात; स्वत:साठी करा हे संकल्प

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT