Long queues of vehicles stuck on the Mumbai-Pune Expressway amid heavy congestion near Lonavala ghat. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

Mumbai-Pune Expressway Missing Link : 'मिसिंग लिंक'चं लोकार्पण झालेलं असतानाच दुसरीकडे एक्स्प्रेस-वेवर प्रवाशांचे वाहतुक कोंडीनं चांगलेच हाल झालेत. सलग सुट्ट्या आणि नियोजनाच्या अभावामुळे लोणावळा घाटात प्रवाशांची कशी कोंडी झाली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Jadhav

  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

  • लोणावळा घाटात प्रवाशांचे हाल

  • ‘मिसिंग लिंक’ असूनही समस्या कायम

लांबच लांब रांगा, कडाक्याचं ऊन आणि बंद पडणाऱ्या गाड्या. ही दृश्य आहेत.मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरची.एकीकडे राज्य सरकारनं मिसिंग लिंकचं उद्धाटन करून वाहतुक कोंडी फोडण्याचा दावा करत असताना दुसरीकडे याचं उद्धाटनामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर प्रवाशांना जुन्याच नरकयातना भोगाव्या लागल्या.

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर पडलेले प्रवाशी एकाच जागी अडकून पडले. चढावावर हाफ क्लचवर गाड्या चालवल्यानं इंजिन गरम होऊन एकामागून एक गाड्या धडाधड बंद पडल्या. 1, 2, 3 नव्हे तर अनेक गाड्या एकाच वेळी बंद पडल्याने प्रवाशांचाही संताप उफाळून आला. या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांनाही बसला. खासदार सुप्रिया सुळे तब्बल 2 तास या वाहतूक कोंडीत अडकल्या.

इतकचं काय तर एसी बंद पडलेल्या गाड्यांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. फूड मॉल्समध्ये पाय ठेवायला जागा उरली नाही.तर ईव्ही चालकांनी चार्जिंग संपण्याच्या भीतीनं रस्त्याच्या कडेला गाड्य़ा उभ्या केल्या. पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवरही वाहनांच्या तब्बल 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

दरम्यान वाहतुक कोंडीत प्रवाशांवर गुदमरण्याची पाळी ओढावलेली असताना खासदार सुनील तटकरेंनी प्रवाशांनाच दमानं घ्या, असा अजब सल्ला दिला. तर उपमुख्यमंत्र्यांनी वाहतुक कोंडी फुटत नाही तोपर्यंत टोल वसुली फ्री करा असं सांगत नेहमीसाऱखा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. खरतर नवीन मिसिंग लिंक प्रकल्पामुळे कोंडी सुटेल असा दावा प्रशासन करत असले तरी, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुक कोंडीनं प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढले. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट माफी मागितली.

क्रेन कोसळल्यानं मानखुर्द, सायन-पनवेल हायवेवर प्रवासी तब्बल 5 ते 6 तास अडकून पडल्याची घटना ताजी आहे..आडोशी बोगद्यातील टँकर अपघातातही 32 तास वाहतुक कोंडी फोडणं यंत्रणांना शक्य झालं नव्हतं. त्यामुळे एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि 'मिसिंग लिंक'ची चर्चा असताना सर्वसामान्य माणसामागची वाहतुक कोंडी मात्र सुटत नाही. .त्यामुळे फक्त कनेक्टीव्हीटी वाढवून चालणार नाही तर त्यासोबत सक्षम अश ीआपत्त्कालीन यंत्रणाही उभी करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT