Kalakand Recipe : ना मावा, ना साखर... तरीही इतका टेस्टी 'कलाकंद' कसा बनवला? श्रावण सोमवारसाठी १ नंबर रेसिपी

Shreya Maskar

श्रावण

उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे. नैवेद्यामध्ये खास कलाकंद बनवा. कलाकंद बनवण्यासाठी दूध, लिंबाचा रस, गूळ, वेलची पूड, बदाम, पिस्ता इत्यादी साहित्य लागते.

Shravan | pinterest

कलाकंद

कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध एका जाड बुडाच्या भांड्यात ओता आणि मध्यम आचेवर गरम करा. ते तळाला चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा, दूध थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा.

Kalakand | pinterest

लिंबाचा रस

दुधात थोडा थोडा लिंबाचा रस घाला आणि हळू हळू ढवळा. थोड्या वेळाने दूध नासेल. मग, ते कापडातून गाळून घ्या आणि जास्तीचे पाणी काढून टाका.

Lemon Juice | pinterest

वेलची पूड

आता तयार झालेले मिश्रण परत घट्ट झालेल्या दुधात मिसळा आणि मंद आचेवर शिजवा. गूळ पावडर आणि वेलची पूड घालून सतत ढवळत राहा.

Cardamom Powder | pinterest

मिश्रण ढवळत रहा

जेव्हा मिश्रण घट्ट होईल आणि भांड्याला चिकटणे बंद होईल, तेव्हा गॅस बंद करा. लक्षात घ्या हे सर्व करताना गॅस मध्य आचेवर ठेवा.

Stir the Mixture | pinterest

डायफ्रूट्स

कलाकंदचे मिश्रण एका ताटात किंवा भांड्यात थोडे तूप लावून पसरवा. त्यावर बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप पसरवून हलकेच दाबून घ्या.

Dry Fruits | pinterest

कलाकंद सेट करा

कलाकंद सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये काही तास ठेवून द्या. हलवाई स्टाईल कलाकंद फक्त १५ मिनिटांत तयार झाला आणि यासाठी तुम्हाला मावाची गरजही भासणार नाही.

Set the Kalakand | pinterest

टीप

कलाकंदसाठी नेहमी ताजे दूध वापरा. दूध शिजवताना सतत ढवळत राहा; यामुळे चव सुधारते. साखरेला पर्याय म्हणून गूळ, खजूर यांचा वापर तुम्ही करू शकता.

Kalakand | pinterest

NEXT : ना गॅसची गरज, ना दूध उकळण्याची कटकट! फक्त १५ मिनिटांत बनवा हलवाई स्टाइल थंडगार रसमलाई

Rasmalai Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...