Shreya Maskar
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावणात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीने रसमलाई बनवा.
गॅसचा वापर न करता, दूध न उकळता तुम्ही १०-१५ मिनिटांत हलवाई स्टाइल रसमलाई बनवू शकता. झटपट होणारी रेसिपी आताच नोट करा.
रसमलाई बनवण्यासाठी मिल्क पावडर, पिठीसाखर, बदाम, काजू, फ्रेश क्रीम, मिल्क पावडर ,दूध , केशर, पिस्ता आणि ब्रेड इत्यादी साहित्य लागते.
रसमलाई बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात अर्धा कप मिल्क पावडर, दोन मोठे चमचे पिठीसाखर आणि कापलेले काजू, बदाम एकत्र करा.
या मिश्रणात चार मोठे चमचे फ्रेश क्रीम घालून चांगले मिसळा आणि पेस्ट बनवून झाकून ठेवा. मिश्रण थोडा वेळ मुरू द्या.
दरम्यान, दुसऱ्या भांड्यात अर्धा कप दूध पावडर, १/४ कप पिठीसाखर घ्या आणि त्यात सुमारे दीड कप थंड दूध घाला. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेत सर्व मिश्रण चांगले मिसळा.
आता त्यात ताजी दुधाची साय, रंगासाठी एक चमचा केशराचे दूध, बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता घाला. सर्व मिश्रण एकत्र करून बाजूला ठेवा.
पांढरा ब्रेडच्या तपकिरी कडा कापून टाका. ब्रेडचा एक तुकडा घ्या, तो दुधात बुडवा आणि हलक्या हाताने पिळून घ्या. त्यात सर्वप्रथम बनवलेले फ्रेश क्रीमचे मिश्रण भरा. ब्रेडचे तोंड बंद करण्यासाठी हलक्या हाताने दाबा आणि त्याला रसमलाईचा आकार द्या.
तयार रसमलाई एका भांड्यात ठेवा आणि त्यावर दूध पावडरचे मिश्रण ओता. आता तयार रसमलाई थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.