Mumbai Pune Expressway Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर तीन वाहने एकमेकांना धडकली; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Satish Daud

सचिन कदम, साम टीव्ही

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापुर हद्दीतील बोगद्याजवळ शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर, गॅस टँकर आणि कार अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षय ढेले (वय ३० रा. अहमदपूर जि.लातूर) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.

सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचं बनलं आहे.

पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील वाहनचालक कोणाचीही भिती न बाळगता सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापुर हद्दीतील बोगद्यात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास तीन वाहने एकमेकांना धडकली. ट्रेलर, गॅस टँकर आणि कार ही तीन वाहने एकमेकांना धडकली. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Breaking News: चेंबुरमध्ये भीषण अग्नितांडव; एकाच घरातील ७ जणांचा मृत्यू

Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

Astro Tips: घराच्या बाहेर घार फिरतेय? हे आहेत संकेत?

Health Tip: सतत घाम येतोय? आहारात करा 'हा' छोटा बदल!

SCROLL FOR NEXT