Mumbai Police Action On Pub Express
मुंबई/पुणे

Mumbai Police Action On Pub: पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर! शहरातील पब, बारची झाडाझडती सुरू

Mumbai Police Action On Pub: मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेत.

Bharat Jadhav

सचिन गाड, साम प्रतिनिधी

मुंबई: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केलीय. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत पोलिस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने १३१ ठिकाणी धाडी टाकून ४३ बारवर कारवाई केलीय.

या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २१ वर्षांखालील तरुणांना दारू विकल्याप्रकरणी दोन कारवाया, टेरेस रूफटॉपमध्ये अवैध दारू पुरवठा केल्याप्रकरणी तीन कारवाया आणि उशिरापर्यंत महिला वेट्रेसद्वारे दारूसेवा पुरविणाऱ्या तीन ठिकाणांसह अन्य कारवाया करण्यात आल्यात.

शहरात करण्यात आलेल्या २३ कारवाया उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरीत्या मुंबई शहर, जिल्ह्यात राबविण्यात आल्यात. विशेष तपासणी मोहिमेत एकूण २३ बारवर विविध स्वरूपाचे नियमभंग केल्याप्रकरणी कारवाया करण्यात आल्यात. यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्रीच्या २ कारवाया, विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री व परवाना कक्षाबाहेर मद्यविक्रीच्या ११ कारवाया, ऑर्केस्ट्रा बारमध्ये उशिरा महिला नोकर काम करताना आढळल्याने १० लेडीज बारवर कारवाई करण्यात आले आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन तरुणांना चिरडलं होतं. या प्रकरणात मोठी घडामोड घडत असून अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबाला पोलिसांनी अटक केलीय. तर अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रक्त चाचण्यांमध्ये गडबडी केल्याचा आरोप केला जात असून या त्यांना अटक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT