Farmer Rasta Roko : पाण्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर; रस्ता रोको आंदोलनात पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट

Sangli News : तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे
Farmer Rasta Roko
Farmer Rasta RokoSaam tv

सांगली : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणी टंचाईची समस्या सगळीकडे भेडसावत आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली असून पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Farmer Rasta Roko
Gondia News : ९५ लक्ष खर्चूनही जल जीवन मिशन योजना फेल; भर उन्हात महिलांची पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती

सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं, तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) आज रस्ता रोको आंदोलन केले.

Farmer Rasta Roko
Akola News : कापूस बियाणे खरेदीसाठी पहाटेपासून शेतकरी रांगेत; पॅकेट कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष

शेतकरी, पोलिसात वाद 

रास्ता रोको आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये (Police) यावेळी जोरदार वादावादीचा आणि झटपटीचा प्रकार देखील घडला आहे. शेतकरी संतप्त असल्याने आपल्या आंदोलनावर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com