Akola News : कापूस बियाणे खरेदीसाठी पहाटेपासून शेतकरी रांगेत; पॅकेट कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष

Akola News : अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशावर तपमानाचा पारा गेला आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. यामुळे कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. दरम्यान लवकर नंबर लागावा यासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी केंद्राच्या बाहेर रांगेत उभे राहत आहेत. भर ऊन्हात अकोल्यात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Akola News
Akola Heat Wave : अकोल्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; १ जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता

अकोल्यात (Akola) गेल्या काही दिवसांपासून ४५ अंशावर तपमानाचा पारा गेला आहे. त्यामुळे अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. तर दुसरीकडे उन्हात शेतकरी बियाणे घेण्यासाठी रांगेत उभा राहत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. दुपारचे साडेबारा वाजलेत तरी शेतकऱ्यांची बियाणे घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. भर ऊन्हात अकोल्यात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या (Farmer) मोठ्या रांगा लागल्यात.

Akola News
Gondia News : ९५ लक्ष खर्चूनही जल जीवन मिशन योजना फेल; भर उन्हात महिलांची पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती

अजित १५५ बियाणासाठी गर्दी  

कापसाचे (Cotton) अजित १५५ बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकर्यांच्या पहाटे सकाळपासून शेतकरी रांगेत उभे आहे. ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. युवा शेतकऱ्यांसह ज्येष्ठ शेतकरी वर्ग देखील रांगेमध्ये उभे आहे. थकवा जाणवल्याने काही शेतकरी रांगेत खाली बसले आहे. उन्हापासून बचाव म्हणून शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचा मंडप उभारला गेला नाही. पहाटे ६ वाजल्यापासून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत, मात्र नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ २ किंवा ३ पॅकेटच बियाण्याचे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com