Holi Saam tv
मुंबई/पुणे

Holi : 'अश्लील गाणी, अनोळखी व्यक्तींना फुगे माराल तर तुरुंगात जाल' होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी

Holi 2025 : होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी केली आहे. 'अश्लील गाणी, अनोळखी व्यक्तींना फुगे माराल तर शिक्षा होईल, असे नियम जारी करण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही

होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. अनोळखी व्यक्तींवर फुगे मारणे, अश्लील गाणी गाण्यास, हावभाव इ. करण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांची नियमावली पोलिसांनी जारी केली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली. पोलिसांच्या नियमावलीनुसार, पादचाऱ्यांवर पाणी अथवा रंग उधळण्यास तसेच फुगे मारण्यास मनाई करण्यात आली आहे. अश्लील शब्द उच्चारणे, हावभाव करणे आणि अश्लील गाणी गाण्यास मुंबई पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. होळी आणि धुलीवंदनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ०७ अपर पोलीस आयुक्त, १९ पोलीस उप आयुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सणाच्या पार्श्वभूमीवर १७६७ पोलीस अधिकारी आणि ९१४५ पोलीस अंमलदार बंदोबस्तकरिता तैनात करण्यात आले आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, आरसीपी प्लाटून, क्युआरटी टीम, बीडीडीएस टीम तसेच होमगार्डसची तैनात करण्यात आले आहेत. तर दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना तसेच वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तवणूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, अमली पदार्थांचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांवरच मुंबई पोलिसांकडून कायदेशी कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT