Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर

Global Konkan Mohostav: सांस्कृतिक वारसा जपत, ग्लोबल कोकण महोत्सव आधुनिकतेच्या दिशेने एक नवा टप्पा गाठत आहे. मराठी तरुणांसाठी हिप-हॉप आणि रॅप संगीताच्या शैलीचा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे
Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर
Konkansaam tv
Published On

कोकणातील घरं बंद, गावं ओस पडली आहेत कारण आपले लोक मुंबईत रोजगार, उच्च शिक्षण आणि मोठ्या संधींच्या शोधात गेले आहेत. पण या महोत्सवात तुम्हाला समजेल की, जे तुम्ही मुंबईत किंवा परदेशात शोधता, ते सर्व कोकणातच आहे.

कोकणात संधी आहेत, रोजगार आहेत, उद्योग उभे राहिले आहेत, आणि निसर्गाच्या सान्निध्यातही यशस्वी आणि समृद्ध होऊ शकता. कोकण फक्त आठवणींसाठी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी आहे! ग्लोबल कोकण महोत्सव तुम्हाला याच वास्तविकतेशी जोडणार आहे.

Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर
Maharashtra Weather: महाराष्ट्र तापणार! यंदा सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा, नागरिकांनो काळजी घ्या

सांस्कृतिक वारसा जपत, ग्लोबल कोकण महोत्सव आधुनिकतेच्या दिशेने एक नवा टप्पा गाठत आहे. मराठी तरुणांसाठी हिप-हॉप आणि रॅप संगीताच्या शैलीचा भव्य कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. हा महोत्सव मराठी कलाकारांना ग्लोबल स्टेजवर स्थान देण्याचा पहिला प्रयत्न आहे. पारंपरिक मराठी संगीताच्या शेजारीच आधुनिक संगीताच्या स्वरूपांचा समावेश करण्यात आलेला आहे. Rukus Avenue Radio (USA) या दक्षिण आशियातील नंबर १ रेडिओ स्टेशनच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर
Kokan Express Way: आता गोव्याला जा सुसाट! ६०० किमीचा प्रवास फक्त ६ तासांत पूर्ण होणार, कसा आहे मेगाप्लान?

यामुळे मराठी संगीताला जागतिक स्तरावर मान्यता मिळवण्याची संधी आहे. भारतातील आणि परदेशातील मराठी कलाकार आपली कला सादर करतील, ज्यात हिप-हॉप, रॅप, बीटबॉक्सिंग, फ्रीस्टाईल परफॉर्मन्स आणि नवीन संगीत शैलिया असे विविध प्रकार प्रस्तुत होणार आहेत. या कार्यक्रमामुळे तरुण कलाकारांना एक ऐतिहासिक संधी मिळेल, जिथे ते त्यांच्या कलेला संपूर्ण जगापर्यंत पोहचवू शकतात.

महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे हिंदू धर्मातील समृद्ध पौराणिक परंपरेचा दर्शन घडवणारा दशावतार नाट्यप्रकार. भगवान विष्णूंच्या दहा प्रमुख अवतारांची कथा भव्य नाट्यमय सादरीकरणाद्वारे पाहता येईल. या कथांमध्ये निःशब्दपणे नैतिकता, सत्य आणि न्याय यांचा संदेश आहे. ११व्या ग्लोबल कोकण महोत्सवात हा दशावतार सोहळा पिढ्यांतर पिढ्यांना आपल्यातील परंपरांना जागवण्याचा अनमोल अनुभव देईल.

Global Kokan Festival: उद्यापासून ग्लोबल कोकण फेस्टिव्हलला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कशी भेट द्याल? वाचा सविस्तर
Kokan : कोकण म्हणजे स्वर्गच! सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरीतील 'या' ठिकाणांना भेट द्याच

लोककला सादरीकरण, कोळी नृत्य, पालखी नृत्य, तारपा, गोंधळ, जाखडी आणि गौरी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांचा रंगमंच येथे अनुभवता येईल. तसेच कौशल इनामदार यांचा 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' हा लोकप्रिय कार्यक्रम देखील महोत्सवाचा भाग असणार आहे. ५०० हून अधिक कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

कोकणाची अनोखी खाद्यसंस्कृतीही या महोत्सवात प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मालवणी, आगरी, संगमेश्वरी, वाडवळ, सीकेपी आणि भंडारी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. मोडक, थालीपीठ, दडपे पोहे, सागोती वडे, मालवणी मटण, पारंपरिक मासे आणि अनेक चविष्ट पदार्थांची चव येथे मिळणार आहे. खाद्यप्रेमींना हे एक अविस्मरणीय अनुभव देईल!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com