सायन-पनवेल महामार्गावर वाशी पुलाजवळ भीषण अपघात
पुलाच्या कामावेळी पायलिंग रिग मशीन कोसळली
अपघातामध्ये पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू
या घटनेनंतर बांधकाम काम तात्पुरते थांबवण्यात आले
मुंबईमध्ये भीषण अपघातामध्ये पोलिसाचा मृत्यू झाला. सायन-पनवेल महामार्गावर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वाशी पुलाजवळ मुंबई महानगर पालिकेकडून सुरू असलेल्या पूलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी मोठी पाइलिंग रिग मशीन अचानक अनियंत्रित होऊन उलटली. ही मशीन अंगावर कोसळून पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला. ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिकेचा रस्ते वाहतूक आणि पूल विभाग वाशी पुलाजवळ महामार्गावर काम करत होते. जमीन खोदण्यासाठी पाइलिंग रिग मशीनचा वापर केला जात होता. हे काम सुरू असताना मशीन अचानक अनियंत्रित झाली आणि कोसळली. याठिकाणावरून जाणारे पोलिस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांच्या अंगावर ही मशीन पडली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि अधिक रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. या घटनेनंतर महामार्गावरील बांधकाम थांबवण्यात आले. ही मशीन बाजूला हटवून पोलिस कॉन्स्टेबलचा मृतदेह बाजूला काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. ही मशीन बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून काम पुन्हा सुरू करता येईल.
पोलिसांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काम सुरू असलेल्या ठिकाणावरून मशीन अचानक कोसळले. त्यातच पोलिसाचा मृत्यू झाला. जर बांधकाम करणाऱ्या कामगारांनी निष्काळजीपणा केला नसता तर पोलिसाला आपला जीव गमवावा लागला नसता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.