mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

मुंबई पोलिसाचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; आदित्य ठाकरेंना बॉडीगार्ड म्हणून सदैव दिली होती साथ

mumbai police : मुंबई पोलीस सुशील भांडे यांचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Akshay Badve

मुंबई पोलिसाचा ऑन ड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड म्हणूनही केलं काम

मुंबई पोलिसाच्या मृत्यूने कर्मचारी वर्तुळात हळहळ

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सुशील मोहन भांडे यांचं निधन झालं. मूळचे पुण्याच्या भोरचे रहिवासी असेलेले सुशील भांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने भोंगवली गावावर शोककळा पसरली आहे.

सुशील भांडे हे मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस स्टेसनमध्ये कार्यरत होते. त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा बॉडीगार्ड म्हणून काही काळ काम केले होते. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले भांडे शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जायचे. त्यांच्या सेवाकाळात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. सुशील भांडे यांच्या अचानक जाण्याने मुंबई पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

सुशील भांडे यांच्या निधनाने त्यांचं मूळ गाव असलेल्या भोर तालुक्यातील भोंगवलीमध्ये शोककळा पसरलीये. सुशील भांडे यांना तरुण वयात हृदयविकाराचा झटका आला. कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रपरिवाराने दु:ख व्यक्त केले.

भांडे यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यसाठी भोंगवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यांच्या पार्थिवाला मुंबई पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मानवंदना दिली. भोंगवली गावातील स्मशानभूमीत इतमामात आणि साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली. सुशील यांच्या अकाली जाण्याने भांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुशील भांडे कोण होते?

सुशील हे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड म्हणून काम केले होतं.

सुशील भांडे यांचा मृत्यू कशामुळे झाला?

सुशील भांडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

पावसाळ्यात त्वचेवर खाज आणि पुरळ येतात? ताबडतोब करा 5 घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

SCROLL FOR NEXT