Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : पराठेवाला महिलांना टार्गेट करायचा, अश्लील व्हिडिओ पाठवायचा; ३० महिला आतापर्यंत शिकार, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Mumbai Crime News : पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि खाकी दाखवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Mumbai Obscene Video Case : महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवत, शरिरसुखाची मागणी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये (Mumbai Police) एका महिलेने तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि खाकी दाखवल्यानंतर धक्कादायक (Mumbai Crime News) माहिती समोर आली. त्या आरोपीने आतापर्यंत २५ महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवत त्रास दिलाय. तो आरोपी व्हीपीएन नेटवर्कद्वारे महिलांना अश्लील व्हिडिओ (Obscene Video) पाठवत होता. आरोपीचं नाव अजीज मोहम्मद निसार खान असे आहे. तो अनोळखी महिलांना संपर्क करून अश्लील व्हिडीओ पाठवत शरीरसुखाची मागणी करत असल्याचे तपास निष्पन्न झालेय.

अजीज मोहम्मद निसार खान याच्या मागावर मुंबई पोलीस मागील दोन महिन्यापासून होते. आरोपी सतत सिम कार्ड बदलत असल्याने तसेच ओपन वायफाय वापरात आल्याने अटक करण्यात अडचणी आल्या होत्या. वांद्र्यातील बेहरामनगर येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकारचं कृत्य करणारी एक टोळीच असल्याचं समोर आलेय.

अश्लील व्हिडीओ-ऑडिओ पाठवून महिलांना त्रास -

मौजमजेच्या नावाखाली ही टोळी काही महिलांना टार्गेट करत होती. त्यांना अश्लील व्हिडीओ-ऑडिओ पाठवत असत. आतापर्यंत दोन डझन महिला यांची शिकार झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित महिलांना अश्लील ऑडिओ आणि व्हिडिओ पाठवून त्रास देत असे. याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकलेला अजीज मोहम्मद निसार खान हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. तो वांद्रे येथील बेहराम पाडा भागात राहतो, त्याचं पराठ्याचे दुकान आहे. अजीज मोहम्मद निसार खान याचं लग्न झालेले असून त्याला दोन लहान मुले आहेत. निर्मलनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण कसं उलगडले ?

वांद्यातील एका ३० वर्षीय महिलेला अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. त्या महिलेने बोलण्यास सुरुवात केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. संतापलेल्या महिलेने त्या अज्ञात व्यक्तीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्या व्यक्तीने अश्लील ऑडिओ क्लिप पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिने या कृत्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा हे अतिप्रमाणात झाल्यानंतर सर्व प्रकाराबद्दल पतीला सांगितले. त्यानंतर दाम्पत्याने निर्मल नगर पोलिसांशी संपर्क साधला. सर्व प्रकार सांगितला अन् तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अन् त्याला बेड्या ठोकल्या.

दोन डझन महिला झाल्या शिकार -

सिनियर पीआय श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय (गुन्हे शाखा) रौफ शेख यांनी या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये त्यांना हा गुन्हा गंभीर असल्याचं निदर्शनास आले. त्याशिवाय यामध्ये १० ते १२ जणांची टोळी सक्रीय असल्याचेही समोर आले. आरोपी खेडवाडी, निर्मलनगर, बेहराम पाडा या भागातच नाही तर सगळ्या मुंबईमधील महिलांना त्रास देत असल्याचं समोर आले. प्राथमिक तपासातून या टोळीची आतापर्यंत ३० महिला शिकार झाल्याचं समोर आलेय.

मोबाईलमधून मिळाले आपत्तीजनक व्हिडिओ-ऑडिओ -

पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी महिलांना व्हिडीओ-ऑडिओ पाठवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करत होते. अजीज मोहम्मद निसार खान याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यामध्ये आपत्तीजनक व्हिडिओ-ऑडिओ क्लिप्स मिळाल्या आहेत. हा फोन तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT