Fact Check  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली, अफवा असल्याची मुंबई पोलिसांची माहिती

Mumbai police alert over missing minor girls: मुंबईत अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. बाल तस्करीची भीती व्यक्त केली जात असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत विशेष शोध मोहीम सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

Missing children cases in Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता झालेल्यांमध्ये ८ मुलींचा समावेश आहे. मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालीय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 'हाय अलर्ट' जारी केलाय. एकाच वेळी इतकी मुले बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे...दरम्यान, ही आकडेवारी चुकीची असून सोशल मीडियावर अफवा पसरवली आहे. संंबधित सोशल मीडिया हँडल्सवर कारवाईचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होणे, ही गंभीर आणि चिंताजनक आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता होण्याच्या या प्रकारामुळे मुंबईत कार्यरत असलेल्या संघटित बाल तस्करी टोळीबद्दल चिंता आणखी बळावली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथके नेमली आहेत.

शिवाजी नगर (४), साकीनाका (२), अँटॉप हिल (२ ) आणि ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर या ठिकाणाहून प्रत्येकी एक मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत आहे. आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. मुलांच्या शोध घेण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले आहे. जून ते डिसेंबर या काळात १४५ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी ९३ मुली होत्या. १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान एकूण ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये निम्म्याहून अधिक मुलींचा समावेश होता. १८ वर्षांखालील ४१ मुली आणि १३ मुलांचा समावेश होता.

२०२५ मध्ये कोणत्या महिन्यात किती बेपत्ता ?

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (पाच मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (सहा मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, सात मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (नऊ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (पाच मुले, सहा मुली)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT