Sea waves crashing at Marine Drive on 26th July, as IMD warns of heavy rain and high tide — reminiscent of 2005 floods 
मुंबई/पुणे

Mumbai 26th July : मुंबईकरांनो सावधान! पुन्हा २६ जुलैचा धोका, समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

Mumbai Rain Alert : २६ जुलै २००५ च्या त्या भयान दिवसाची आठवण आजही मुंबईकरांच्या मनात कायम आहे. आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाच इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय समुद्रात मोठी भरती येणार आहे.

Namdeo Kumbhar

  • पालघर, पुणे घाटमाथा यांसह चार जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

  • २६ जुलै २००५ च्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता.

  • दुपारी १२:३५ ला समुद्रात ४.६७ मीटर उंचीची भरती, किनाऱ्यावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन.

Will it rain heavily in Mumbai on 26th July 2025 : मुंबईतील २६ जुलै २००५ च्या प्रलयंकारी पावसाला आज दोन दशकं झाली. त्या भयानक दिवसाच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या डोक्यात कायम आहेत. आजही मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय समुद्रात मोठ्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, त्याशिवाय समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये आज मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. आज समुद्रात सर्वात मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी एक वाजता समुद्रात मोठी भरती अन् लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबईवर पुन्हा एकदा २० वर्षांपूर्वीचाच धोका जाणवत आहे. आजही पावसाने धुमाकूळ घातल्यास मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज नसेल, तर घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील तो भयानक दिवस -

२० वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी मुंबईवर निसर्गानं अक्राळविक्राळ तांडव केलं होतं. अवघ्या 24 तासांत मुंबईत 944 मिमी पाऊस पडला होता. जो शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम ठरला. आजच्याच दिवळी 20 वर्षांपूर्वी जवळपास 1 हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. 37 हजार रिक्षा, 4 हजार टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेस जलमय झाल्या. हजारो घरं उद्ध्वस्त झाली आणि कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं. संपूर्ण शहर थांबून गेल होतं. आणि नागरिकांच्या मनात कायमची एक भीती निर्माण झाली.

मुंबईकरांसाठी पुढील चार तास महत्त्वाचे -

मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही सकाळपासून मुंबईमध्ये संततधार सुरूच आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम, दुहेरी संकट -

आज मुंबईत पावसाचा जोर कायम आहे, पण २००५ च्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. आज, २६ जुलै रोजी, दुपारी १२:३५ वाजता ४.६७ मीटर उंचीची सर्वात मोठी भरती येणार आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. पालिकेने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. त्यामुळे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २००५ नंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा केल्या आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण-डोंबिवली येथे चार एक्स-बॅंड रडार बसवण्यात आले. त्यामुळे पावसाचा अंदाज सहा तास आधीच समजतो.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत किती पाऊस पडला होता?

सांताक्रूझ येथे २४ तासांत ९४४ मिमी पाऊस पडला, जो मुंबईच्या इतिहासातील सर्वाधिक एकदिवसीय पावसाची नोंद आहे.

२६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसामुळे किती जणांचा मृत्यू झाला?

१,००० लोकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले आणि शेकडो घरे, दुकाने उद्ध्वस्त झाली.

अतिवृष्टीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम झाला?

लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवासी अडकले.

मुंबईकरांनी या संकटाला कसे तोंड दिले?

मुंबईकरांनी एकजुटीने स्वयंसेवा केली, अडकलेल्यांना अन्न, पाणी आणि निवारा पुरवला आणि एकमेकांना वाचवले.

कोणत्या भागात सर्वाधिक पाणी साचले?

अंधेरी, कुर्ला, सायन, चेंबूर, मालाड, भांडुप आणि घाटकोपर यासारख्या सखल भागात सर्वाधिक पाणी साचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT