पालघर, पुणे घाट, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज आयएमडीकडून रेड अलर्ट जारी.
कोकण, मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट
पालघर आणि महाड-पोलादपूर येथे शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी.
मुसळधार पावसामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू
Maharashtra IMD alert : मागील चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरणक्षेत्रातील पाणीसाठीही वाढत आहे. आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पालघर, पुणे घाटमाथ्यासह गोंदिया आणि चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कल्याण अन् नवी मुंबईमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय रायगडमधील महाडमध्येही आज सर्व शाळांना सुट्टी जारी करण्यात आली आहे. (IMD heavy rainfall alert for Pune, Palghar, Gondia, Chandrapur)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट. मागील दोन दिवस पालघर जिल्ह्यात संतधार कायम असली तरी जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप तर काही भागात पावसाची विश्रांती. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता कायम . रेड अलर्ट असल्याने शाळा ,कॉलेज आणि अंगणवाडी यांना आज सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांचा आदेश जारी. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 85% भरलं. धामणी धरणाचे तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडले. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणा मिळून जवळपास दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्य नदीद्वारे सुरू. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.
आज रायगडला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे आणि पावसाचा जोर देखील कायम आहे. काल रात्री पासून महाड, पोलादपुर आणि महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसानंतर महाडमध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाड आणि पोलादपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रेड अलर्ट :
पालघर, पुणे घाटमाथा, गोंदिया, चंद्रपूर.
ऑरेंज अलर्ट :
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली. जोरदार पावसाचा इशारा
येलो अलर्ट :
नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.
कोणत्या जिल्ह्यांना २६ जुलै २०२५ साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे?
पालघर, पुणे घाटमाथा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२६ जुलै २०२५ रोजी शाळांना सुट्टी कुठे जाहीर केली आहे?
पालघर आणि रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२६ जुलै २०२५ रोजी मुंबईसाठी कोणता हवामान इशारा देण्यात आला आहे?
मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२६ जुलै २०२५ साठी हवामान विभागाने कोणत्या भागात उंच लाटांचा इशारा दिला आहे?
कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.