मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला आहे. मुंबईतील सहा जागांपैकी एक जागा महायुतीने जिंकली आहे. या मतदारसंघातून पियूष गोयल साडे तीन लाखांच्या फरकाने जिंकले आहेत.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महायुतीला एकच जागेवर समाधान मानावे लागले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा जाहीर झाली आहे. पियूष गोयल ३,५०, ९२१ मतांनी जिंकले आहेत. तर या मतदारसंघात भूषण पाटील यांना ३,१३, ०४६ लाख मते मिळाली आहेत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ साली गोपाळ शेट्टी जिंकले आहेत. २०१९ साली गोपाळ शेट्टी यांचा उत्तर मुंबईतून ४,६५,२४८ मतांनी विजय झाला होता. त्यानंतर यंदाच्या लोकसभेत भाजपचं १ लाखांनी मताधिक्य घटल्याचं दिसून आलं.
दरम्यान, उत्तर मुंबईत १९५२ ते १९६२ सालापर्यंत काँग्रेसचं राज्य होतं. १९७७ आणि १९८० साली या मतदारसंघात जनता पार्टीचे उमेदवार जिंकले होते. तर १९८४ साली काँग्रेसची पुन्हा एन्ट्री झाली. त्यानंतर १९८९ साली भाजपने जागा जिंकली. त्यानंतर १९९९ साली देखील भाजपने जागा जिंकली. यानंतर २००४ साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. तर २००९ साली देखील काँग्रेस जिंकली होती. पुढे २०१४ आणि २०१९ साली भाजपने जागा जिंकली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.