Uddhav Thackeray On India Aghadi PM Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: निवडणुकीत मतदारांनी खडे चारले, आता तरी सुधारणार की पक्षांना संपवणार? ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल

Maharashtra Politics Breaking News: लोकसभा निवडणूक निकालावरुन शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. आता तरी पंतप्रधान मणिपूरला जाणार का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Gangappa Pujari

आवेश तांदळे|मुंबई, ता. १२ जून २०२४

मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब निवडणूक लढवत आहेत. आज अनिल परब यांनी आपल्या संकल्पपत्राचे अनावरण केले. या अनावरणावेळी शिवसेना ठाकरेगट प्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नव्या एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाड नाही. संवाद करताना कनेक्शन लूज झाले. मी निवडणूक झाल्यानंतर बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळात तारखा जवळ आल्या होत्या. त्यामुळे अर्ज भरणे राहू नये म्हणून उमेदवार जाहीर केले. दिल्लीतून फोन आले आहेत, त्यांच्याशी बोलून काही निर्णय होत आहेत," असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

"जम्मू काश्मिरमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. याची जबाबदारी कोणाची आहे. मोहन भागवत यांनी सांगितले मणिपूर जळत आहे. वर्षभरानंतर भागवत साहेब बोलले. त्यावर पंतप्रधान गांभीर्याने घेणार आहेत का? आता तरी मोदीजी मणिपूरमध्ये जाणार का? तसेच काश्मिरमध्येही हल्ले होत आहेत. आता तरी लक्ष देणार का? तुमचेच ढोल वाजणावर, रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

देशातील मतदारांनी भाजपला खडे चारले. आतातरी भाजप सुधारणार आहे का? की अजूनही देशातले पक्ष संपवण्याच्या मागे लागणार आहे? आता तरी ते देशासमोरील संकटे संपवणार की देशाच्या जनतेच्या व्यथा, प्रश्न संसदेत मांडणाऱ्या लोकांना संपवणार? असे म्हणत हे सरकार कुचकामी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली

White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Crime: गरोदर गर्लफ्रेंडची हत्या, सीरियल किलर निघाला बॉयफ्रेंड; आरोपीने चौघांचा जीव घेतला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा, परतीच्या प्रवासात गणेशभक्तांचे हाल

Maratha Reservation Row: मराठ्यांनो थोडं थांबा! सरकारने गडबड केलीय; कोणी केला हा सर्वात मोठा दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT