Mumbai Aarey Colony water tank drowning incident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: शाळेत न जाता पोहायला गेले, पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू; मुंबईतील दुर्दैवी घटना

Goregaon Aarey Colony: गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. हे दोन्ही मुलं शाळेत न जाता पोहण्यासाठी आले असता ही घटना घडली.

Priya More
  • पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

  • गोरेगावच्या आरे कॉलनीमधील घटना

  • शाळेत न जाता पोहण्यासाठी गेले असता घडली घटना

  • या घटनेमुळे गोरेगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

संजय गडदे, मुंबई

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमध्ये दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या टाकीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. गौतम नगरच्या मॉडर्न बेकरी जंक्शन परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली. गुरे बांधण्याच्या गोठ्यातील पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी ही मुलं गेली होती. पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा टाकीत बुडून मृ्त्यू झाला. दोन्ही मुलांना बुडाल्यानंतर बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११.५५ वाजता आरे कॉलनीमध्ये ही घटना घडली. दोन्ही मुलं पाण्याच्या टाकीत बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक, आरे कॉलनी पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करत दोन्ही मुलांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले.

दोन्ही मुलांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. एचबीटी रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मृत मुलांची नावे झैब पटेल (१५ वर्षे) आणि नखीब पटेल (१३ वर्षे) अशी आहेत.

झैब हा दहावीच्या वर्गात, तर नखीब हा नववीच्या वर्गात शिकत होता. दोघेही जोगेश्वरी गुंफा इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी होते. दोन्ही विद्यार्थी शुक्रवारी शाळेत गैरहजर होते, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धुमाळ यांनी दिली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मुले पाण्याच्या टाकीत पोहण्यासाठी नेमकी कशी पोहोचली? तसेच टाकीच्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना होत्या याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: १३ वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता माळीला ओळखणंही कठीण; 'जुळून येती रेशीमगाठी'मधील फोटो व्हायरल

शिक्षकांना जनगणना ड्युटीला नकार देता येणार नाही: हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra Politics: कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नितेश राणेंनी बडा नेता फोडला

Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

डेलीवेअरसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल मंगळसूत्र; पाहा 5 लेटेस्ट डिझाईन्स!

SCROLL FOR NEXT