Girl Died After Falling From Terrace Case Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : तरूणीचा टेरेसवरून झोपेत पडून मृत्यू; घटनेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

Girl Died After Falling From Terrace Case: मुंबईतल्या शिवडी परिसरात १८ वर्षीय तरुणीचा इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ट्विस्ट आला असून शिवडी पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईतल्या शिवडी परिसरामध्ये एका तरुणीचा झोपेत असताना इमारतीच्या टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेप्रकरणी शिवडी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या आईने मुलीच्या हत्येचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिवडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरात १८ वर्षीय तरुणीचा इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू प्रकरणी शिवडी पोलिसांनी तिच्या प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा १६ वर्षीय प्रियकराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल होताच अल्पवयीन आरोपी मुलाची पोलिसांनी बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

मृत तरुणीच्या आईने मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिवडी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं.

सोमवारी सकाळी शिवडीतील टाटा मैदानाजवळील एका पडीक इमारतीच्या टेरेसवरून पडून कशिष शेख ऊर्फ कशिष कसबे नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. सुरूवातील कशिष झोपेतून टेरेसवरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण तिचा मृत्यू नाही तर हत्या झाल्याचा संशय तिच्या आईला आला त्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान, शिवडीमध्ये राहणाऱ्या कळिषचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली होती. ही तरुणी चौथ्या मजल्यावरील टेरेसवर झोपली होती. त्याचवेळी झोपेतच ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली होती. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ केईएम रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Jalgaon: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Crime News : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला ₹६०० त रूम दिली, नंतर दोघांनी डाव रचला; १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT