Abhishek Ghosalkar Death Case: Saamtv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar Death: सलमान खानसाठी तत्परता; अभिषेकच्या हत्येकडे दुर्लक्ष का? तेजस्वी घोसाळकरांची उद्विग्न पोस्ट

Abhishek Ghosalkar Death Case: सलमान खानच्या हत्येनंतर तत्परता दाखवणारी मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास का करत नाही, असा सवाल करत तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Gangappa Pujari

मुंबई|ता. १५ एप्रिल २०२४

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सिने जगतासह पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीसांनी वेगाने तपास चक्रे फिरवण्यास सुरूवात केली आहे. अशातच सलमान खानच्या हत्येनंतर तत्परता दाखवणारी मुंबई पोलीस अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा तपास का करत नाही, असा सवाल करत तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांची फेसबूक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

काय म्हणाल्यात तेजस्वी घोसाळकर?

"सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीजकडून त्वरीत कारवाई करण्यात आली. या हाय-प्रोफाइल घटनेवर तात्काळ लक्ष केंद्रित केले जाते. मात्र निष्काळजीपणाचे, त्रासदायक प्रकरण म्हणजे माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा न झालेला उलगडा.

मला सुरक्षा का नाही?

अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येनंतर धोका असताना पोलिसांनी माझ्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही त्याहून चिंताजनक बाब आहे. जर सिस्टीम एखाद्या सेलिब्रिटीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी रॅली काढू शकते तर मला सलमान खानसारखे संरक्षण का दिले गेले नाही. कारवाईवरील विसंगती आपल्या न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षता आणि परिणामकारकतेबद्दल चिंता निर्माण करते. सामाजिक स्थिती किंवा सेलिब्रिटी असा विचार न करता सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्वाचे आहे," असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे.

फेसबुक लाईव्ह करत झाली होती हत्या..

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह दरम्यान गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. याच प्रकरणावरुन तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी राज्य सरकार तसेच तपास यंत्रणांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT