Abhishek Ghosalkar Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर...

Abhishek Ghosalkar News: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला असून धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
abhishek ghosalkar cctv video
abhishek ghosalkar cctv videoSaam TV
Published On

Abhishek Ghosalkar Case Latest Update

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिस याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

abhishek ghosalkar cctv video
Maharashtra Politics: शरद पवार की अजित पवार, कुणाचे आमदार ठरणार अपात्र? आज होणार महत्वपूर्ण फैसला

तपासादरम्यान, एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. जेव्हा हत्याकांडाचा हा प्रकार घडला, तेव्हा आरोपी मॉरिस याच्यासोबत काही लोक ऑफिसमध्ये आले होते. गोळीबार होण्याआधी ते तेथून बाहेर पडले. (Latest Marathi News)

यामध्ये आरोपी मॉरिस याचा मित्र मेहुल सुद्धा होता. गोळीबारानंतर तो तिथून बाहेर पडला आणि रिक्षाजवळ गेला. तिथून परत एकदा पान टपरीजवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेला, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

दरम्यान, मेहुलसोबत रिक्षामध्ये असलेले ते दोघे कोण होते? मेहुल याला गोळीबाराबाबत काही माहिती होती का? असे अनेक सवाल सीसीटीव्ही फुटेज पाहून उपस्थित होत आहेत. सध्या गुन्हे शाखेकडून या व्हिडीत असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

मॉरिसने घोसाळकरांची हत्या का केली?

आरोपी मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य होते. काही दिवसांपूर्वी एका बलात्कार प्रकरणात मॉरिसला तुरुंगवारी झाली होती. आपल्या अटकेमागे घोसाळकर यांचाच हात असल्याचा संशय मॉरिसला होता. याच संशयातून त्याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगितलं जातंय.

abhishek ghosalkar cctv video
Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक? पाहा ताजी आकडेवारी...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com