BMC Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : मुंबई महापालिकेत आणखी एक मोठा घोटाळा? माजी विरोधी पक्षनेत्याचं बीएमसी आयुक्तांना पत्र

कोट्यावधी रूपये या फंडात जमा होतात आणि गरीब रूग्णांना यातून मदत केली जाते.

साम टिव्ही ब्युरो

>> निवृत्ती बाबर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात PBCF (Poor Box Charitable Fund) गरीब रुग्ण सहाय्यता निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. याविषयी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहलं आहे.

कोट्यावधी रूपये या फंडात जमा होतात आणि गरीब रूग्णांना यातून मदत केली जाते. 2017 पासूनच्या जुन्या केसेसमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून या निधीवर डल्ला मारला गेलाय. यासाठी डिन, डेप्युटी डिन, एएमओ आणि युनिट हेड यांच्या बोगस सह्या आणि बोगस स्टॅम्प तयार करण्यात आले. (Latest Marathi News)

केवळ एका नोंद वहीत 65 लाखांचा भ्रष्टाचार उघड झालाय. ऊर्वरीत नोंदवहीतील व्यवहारांची कसून चौकशी केल्यास आणखी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर येऊ शकतो. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाली गायकवाड यांना अटकही झाली होती.

परंतु त्यांना वाचवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून होत आहेत. केवळ एक कर्मचारी हा भ्रष्टाचार करू शकणार नाही, तर यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा गुंतले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT