Shocking Information Revealed In Vishal Pawar Dies Case Saam Tv
मुंबई/पुणे

Constable Vishal Pawar Death Case: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरण, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Shocking Information Revealed In Vishal Pawar Dies Case: विशाल पवार यांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात विशाल पवार यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबई पोलिस दलात (Mumbai Police Force) कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला (Vishal Pawar Death Case) दिवसेंदिवस वेगळं वळण येत आहे. आता विशाल पवार यांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात विशाल पवार यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा लोहमार्ग पोलिस तपास बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे.

१ मे रोजी कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी विशाला पवारचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या जबाबात मोबाईल चोरांचा पाठलाग करत असताना सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दुल्ल्यांनी हल्ला केल्याचा विशाल पवारांनी दावा केला होता. तसंच चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांनी आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा देखील दावा विशाल पवार यांनी मृत्यूपूर्वी केला होता. पण तपासामध्ये ही सगळी कहाणी बनाव असल्याचे उघड झालं होतं.

विशाल पवार यांनी ही सर्व रचलेली कथा असल्याचा पोलिसांना संशय होता. अशामध्ये आता शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय आता खरा ठरला आहे. अशामध्ये दारुचे अतिसेवन केल्यामुळे विशाल पवार यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात मोबाइल चोरांनी आणि गर्दुल्यांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी उपस्थित नसल्याचे सीसीटीव्हीत कॅमेऱ्याच्या तपासातून समोर आलं होतं. तसंच, विशाल पाटील यांनी जबाबत सांगितल्याप्रमाणे त्यांनी माटुंगा स्थानकावर रात्रभर काढण्याचे सीसीटीव्हीत दिसून आले नाही. हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतरचे ४ ते ५ तास विशाल पावर हे इतरत्र असल्याचे तपासातून समोर आले होते. त्यामुळे विशाल पाटील यांनी ही सर्व रचलेली कथा होती असा पोलिसांचा संशय होता आणि तो खरा ठरला. त्यामुळे पोलिस हे प्रकरण बंद करण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT