Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Pune Accident: पार्टी करून घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी १७ वर्षीय कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू
Pune Accident:Saam Tv

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये ही घटना घडली. पार्टी करून घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी १७ वर्षीय कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारस ही घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला चिरडले. विना नंबर प्लेट महागडी कार भरधाव चालवत तरुणाने दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ब्रम्हा सनसिटीमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या भरधाव कारने एका दुचाकीसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये तरुण आणि तरूणीचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री पार्टी करून कार चालवणाऱ्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांचा जीव घेतला

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू
Pune Metro News: पुणेकरांसांठी गुडन्यूज! फक्त १०० रुपयांचा पास अन् मेट्रोने करा दिवसभर प्रवास; काय आहे नवी योजना?

पुणे शहरातील अनेक पब्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अपघातामध्ये मृत्यू झालेले तरुण आणि तरुणी हे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी संपल्यानंतर अडीचच्या सुमारास घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर पोहचताच भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते.

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू
Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

या घटनेनंतर काही तरुणांनी कारचालकाला पकडले आणि मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारचालकवेदांत विशाल अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा आहे. या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अश्निनीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अनिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

निष्काळजीपणाने भरधाव वेगाने कार चालवल्यामुळे ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. या अपघातप्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र एकीब रमजान मुल्ला यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी कारचालक वेदांत विशाल अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून येते.

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू
Pune Accident: सुसाट बाईक पळवली, नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबला धडकला; तरुणाचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com