mumbai crime news  saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! मुंबईत शाळकरी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी केली महिलेला अटक

शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली महिलेला अटक करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना (Student) नशेचे पदार्थ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने मुंबईत (Mumbai) खळबळ उडाली आहे. मुंबईच्या बोरिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवली एमएचबी पोलिसांकडून या प्रकरणी गुरुवारी दुपारी एका महिलेला अटक करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकल्याप्रकरणी पोलिसांकडून गुरुवारी दुपारी एका ५२ वर्षीय महिलेला अटक केली. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली महिलेला अटक करण्यात आली. आरोपी महिलेकडून २३५ ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २०० रुपये इतकी आहे.

बुधवारी दहिसर भागातील एका उद्यानात शालेय गणवेशात काही मुले धूम्रपान करत असल्याचे शिवसैनिकास आढळून आले ही बाब त्याने माजी शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांना फोनद्वारे कळविले. त्यानंतर कवळी यांनी सदर ठिकाणी जाऊन त्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला.यापैकी तीन मुले पळून जाण्यात यशस्वी झाली.

मुले पळाल्यामुळे काहीतरी गैरप्रकार होत असल्याचं लक्षात येताच कवळी यांनी त्या मुलांना नाव आणि शाळेचे नाव विचारून माहिती घेत ही बाब पोलिसांना कळविली. यानंतर एम.एच.बी पोलिसांनी शिवाजी नगर गल्ली नंबर १ मधून गांजा विकणाऱ्या महिलेला काल दुपारी अटक केली आहे.

अटक आरोपी महिला गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना ड्रग्स विक्री करण्याचं काम करत होती. ड्रग्स विकणारी महिला अटक केल्यानंतर घटनेची माहिती मिळताच बोरिवली आणि दहिसर पश्चिमच्या परिसरामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचा पालकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या आरोपी महिलेकडून अधिक तपास एम .एच.बी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

SCROLL FOR NEXT