Mumbai: रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, भाडेवाढीला सरकारचा हिरवा कंदील; जाणून घ्या नवे दर

मुंबई रिक्षा-टॅक्सी संघटनांनी सोमवार, २६ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी संपाची हाक दिली होती.
Rickshaw-Taxi Travel New Rate
Rickshaw-Taxi Travel New RateSaam TV
Published On

मुंबई : सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाही भाडेवाढ मिळत नसल्याने मुंबई रिक्षा-टॅक्सी संघटनांनी (Mumbai Rickshaw-Taxi Associations) सोमवार, २६ सप्टेंबरपासून रिक्षा-टॅक्सी संपाची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज टॅक्सी रिक्षा चालक संघटनेसोबत मंत्रालयात बैठक घेतली.

या बैठकीत मुंबईत सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने चालकांच्या उत्पादनावर परिणाम होत असून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी उद्योग मंत्र्यांकडे केली. या संपापूर्वी तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रयत्न केला असून उद्योग मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर संघटनांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

पाहा व्हिडीओ -

रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार मुंबईत रिक्षाच्या 2 रुपयाने तर टॅक्सीच्या प्रवासासाठी 3 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली असून त्यानुसार रिक्षा 24 आणि टॅक्सी 30 रुपये भाड्याला मंजुरी देण्यात आली आहे. हे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Rickshaw-Taxi Travel New Rate
मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'कायदा व्यवस्थेची जबाबदारी...'

दरम्यान, आजच्या बैठकीत मुंबईतील रिक्षा टॅक्सी संघटनांच्या 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. कल्याणकारी मंडळ, सीएनजी दरवाढ, टॉयलेट, भाडेवाढ याबाबत चर्चा झाली असून खटवा समितीच्या अहवालानुसार हि भाडेवाढ करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com