Mumbai Accident Video Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर, कारने तिघांना चिरडले; मुंबईतील भीषण अपघाताचा CCTV पाहा

Kandivali Accident CCTV Video: शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले त्यामुळे हा अपघात झाला. कारचालकाने तिघांना चिरडले. २१ जूनला कांदिवलीमध्ये ही घटना घडली होती. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये भीषण कार अपघाताची (Car Accident) घटना समोर आली आहे. कारने ३ जणांना चिरडले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. कांदिवलीमध्ये (Kandivali) ही घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले त्यामुळे हा अपघात झाला. कारचालकाने तिघांना चिरडले. कांदिवलीच्या पोयसर परिसरातच हा अपघात झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. २१ जूनला अपघाताची ही घटना घडली होती.

कांदिवलीच्या माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता. कांदिवली परिसरात राहणारे टॅक्सी चालक राजेंद्र गुप्ता हे मित्र सुरेंद्र गुप्ताला शुक्रवारी कार चालवण्यास शिकवत होते. सुरेंद्रकडे कार चालवण्यासाठीचा परवाना नव्हता. तरी देखील तो विनापरवाना कार चालवण्यास शिकत होता. यावेळी सुरेंद्रने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले. त्यामुळे कार वेगाने पुढे गेली आणि कारने तिघांना चिरडले. जोरात धडक बसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणे कार चालवल्याप्रकरणी कारमालक सुरेंद्र गुप्ता आणि चालक राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing: दिशा पाटनीच्या घरावर फायरिंग करण्याआधी शूटर्स दिसते पेट्रोल पंपावर; CCTV व्हिडिओ व्हायरल

Theur Flood : नैसर्गिक प्रवाह बंद करत प्लॉटिंग; मुसळधार पावसानंतर थेऊरमध्ये पूरस्थिती, ७ जणांवर गुन्हा दाखल

Accident: बुलडाण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

SCROLL FOR NEXT