Worli Building Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: वरळीमध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

Worli Building Fire: वरळीतील पूनम चेंबर्स या इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

सचिन गाड, मुंबई

वरळीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वरळीतील पूनम चेंबर्स या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील पूनम चेंबर्स या सात मजली इमारतीला आज सकाळी ११.३९ वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आग अटोक्यामध्ये आणली.

सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयाला आग लागली होती. सुरूवातीला एक छोटा स्फोट झाल्याचा आवाज लोकांनी ऐकला आणि त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि अल्पावधीत आगीने भीषण रूप धारण केले.

आज सुट्टीचा दिवस असल्याने या इमारतीमधील सर्व ऑफिसेस खाली होते. इमारत रिकामी असल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. मात्र या इमारतीच्या तळ मजल्यावर डॉक्टरांचे प्रशिक्षण सुरू होतं. आग लागल्याचे समजताच सगळ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं.

या आधी देखील अनेक वेळा पूनम चेंबर्स या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली आणि माहिती घेतली. त्यांनी देखील आगीत कोणी जखमी झालं नसल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT