Uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Shivaji Park Dussehra Melava: शिवतीर्थावरून आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी काय तयारी? पाहा VIDEO

Uddhav Thackeray: दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय भाषण करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Priya More

ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे नेमकं भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवतिर्थावर आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असणार आहे. शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण ६० हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येणार आहेत. जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण सर्वांना ऐकता येतील. शिवतीर्थ शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी भगवमय करण्याची तयारी केली आहे.

शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यात सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील. प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन आणि सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्वात आधी भाषण करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदुत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे.

मोदी-शाह यांचे महाराष्ट्र दौरे, भाजप नेतृत्व आणि महायुतीकडून केली जाणारी वक्तव्य याचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या शिवतिर्थावरील भाषणात घेण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त दसरा मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तीन उपायुक्त, पाच सहाय्यक आयुक्त, ६० अधिकारी आणि जवळपास ३०० कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्यासंख्येने शिवसेनाप्रेमी येत असतात. राज्यभरातून येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने आि शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बॅग अथवा अन्य वस्तू घेऊन येऊ नये, असे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे पालन तंतोतंत करावे. तसंच शिवाजी पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना पोलिस सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT