Mumbai News Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: धक्कादायक प्रकार! ट्रेनच्या रनिंग रूममध्ये भरदिवसा दारु पार्टी; ३ टीटीई निलंबित

Western Railway News: वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनास आले. या तीनही टीटीईंना निलंबित करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसच्या टीटीई लॉबीमध्ये दिवसाढवळ्या दारू पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ डीसीएमचा पदभार नुकताच स्वीकारल्यानंतर अधिकारी कारवाईच्या मूडमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळाले.

बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारू पार्टी करत असल्याचे निदर्शनात आले. तिन्ही टीटीईंना रेल्वे आवारात मद्यप्राशन करताना रंगेहात पकडण्यात आले.

हा प्रकार समोर आल्यानंतर तिन्ही टीटीईंना निलंबित करण्यात आले असून, त्याची माहिती बडोदा विभागाला देण्यात आली आहे. समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) अशी मद्यपान करताना पकडलेल्या तीन टीटीईंची नावे आहेत. हे तीन टीटीई बडोदा विभागातील असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Government Job: चौथी आणि दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कोचिन शिपयार्डमध्ये जॉब; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: अचानक वेगाने गेंडा आला रस्त्यावर, लोकांना पळता येईना, पुढे जे घडलं ते पाहा

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव, वयाच्या १६व्या वर्षीच...

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT