Leptospirosis Patient : जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण; आरोग्य पथकाकडून पाहणी

Jalgaon News जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण; आरोग्य पथकाकडून पाहणी
Leptospirosis Patient
Leptospirosis PatientSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : तालुक्यात पहिल्यांदाच ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण आढळून आला असून, डांगरी (Jalgaon) येथील चार वर्षांच्या बालकाला ही लागण झाली आहे. जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या (Health Department) पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली. (Live Marathi News)

Leptospirosis Patient
Bribe Trap: पाच लाखांची लाच घेताना लेखापरिक्षक ताब्यात

अमळनेर तालुक्यात प्रथमच या रोगाचे रुग्ण आढळून आले असून, चार वर्षांच्या बालकाला लागण झाली होती. हे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले होते. परत आल्यावर कुटुंबातील बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी हे निदान करण्यात आले. सध्या उपचार घेऊन बालक व कुटुंबीय घरी पोहोचले असून, बालकाची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बहेकर यांच्या सूचनेवरून जिल्हा साथरोग अधिकारी प्रमोद पांढरे व डॉ. वाभळे, हिवताप नियंत्रण विभागाचे आरोग्य सहाय्यक विपुल लोणारी व धनराज सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. रनाळकर यांच्यासह पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.

Leptospirosis Patient
Dombivali Crime News: रमी सर्कलवर गेम खेळून झाला कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केली चोरी, मात्र धाडसी तरुणामुळे पकडला गेला

रोगबाधित प्राण्यांच्या लघुशंकेतून ‘लेप्टोस्पायरोसिस’ नावाच्या या रोगाचा प्रसार होत असून, या आजारात तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाचे रुग्ण मुख्यत्वे करून भात व ऊस लागवडीच्या क्षेत्रात तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आदी भागांत आढळून येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com