Coastal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच गळती, VIDEO व्हायरल

Coastal Road leaks Video: मुंबईत पावसाला सुरूवात होण्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत आला होता. अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झाली आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

मुंबईचा मानबिंदू असलेल्या कोस्टल रोडला (Coastal Road) गळती लागल्याची घटना समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती लागल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडला गळती लागल्याचा हा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो व्हायरल होत आहे. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी (Marin Drive To Worli) हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आला खरा. पण अवघ्या काही दिवसांमध्येच कोस्टल रोडला गळती लागल्याचे चित्र समोर आले आहे.

कोस्टल रोडच्या ⁠टनेलमध्ये पाणी गळतंय. कोस्टल रोडच्या भिंतीतून आणि छतातून पाणी गळायला सुरुवात झाली आहे. ⁠मुंबईत पावसाळ्याला अद्याप सुरूवात नाही. तरी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती होत असल्याने यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. उद्या मान्सून पूर्व आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत हा सवाल उपस्थित होणार असल्याची माहीती आहे.

कोस्टल रोडचा हा फेज ११ मार्चला सुरू झाला होता. अवघ्या दोन महिन्यांमध्ये कोस्टल रोडच्या या फेजची ही अवस्था झाली आहे. भारतात टनेल बोरींगचा पहिल्यांदाच वापर या बोगद्यासाठी करण्यात आला होता. मुंबई महापालिका हा अतिमहत्वकांशी प्रकल्प करत आहे. पण या कोस्टल रोडमध्ये गळती होत असल्याने याबाबत आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, कोस्टल रोडचा पुढचा टप्पा हा वरळी सी लिंककडील दक्षिण टोकापर्यंत असणार आहे. या टप्प्याचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल. कोस्टल रोडचा हा पुढचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर याठिकाणावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि महत्वाचे म्हणजे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल. कोस्टल रोडद्वारे पश्चिम उपनगरातील वांद्रे येथून नरिमन पॉइंटपर्यंतचं अंतर २० मिनिटांत कापता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT