Rehan Qureshi Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: २२ मुलींवर केला अत्याचार, नराधमाची या प्रकरणात झाली निर्दोष मुक्तता

Rehan Qureshi: २२ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचाआरोप असलेल्या रेहान कुरेशीची कोर्टाने एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. दिंडोशी कोर्टाने हा निकाल दिला आहे.

Priya More

मुंबईसह वसई, नवी मुंबई आणि ठाण्यात २२ अल्पवयीन मुलींवर कथित बलात्कार, अपहरण आणि विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या रेहान कुरेशीची कोर्टाने एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने एका प्रकरणात रेहान कुरेशीची निर्दोष मुक्तता केली. रेहान कुरेशी इतर २१ खटल्यांमध्ये न्याायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणांचे खटले अद्याप चालू आहेत. रेहान सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

रेहान कुरेशीची ज्या प्रकरणात निर्दोष मुक्तात झाली याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, ॲड. नाजनीन खत्री यांनी आरोपी रेहान कुरेशीची बाजू मांडली होती. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नाजनीन खत्री यांनी युक्तीवाद केला की, 'आरोपीने कोणताही विनयभंग केलेला नाही. शरीराच्या अवयवांना स्पर्श देखील केला नाही.' पीपी ॲड. मालणकर यांनी गोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एम.टाकळीकर यांनी आरोपी रेहान कुरेशीची निर्दोष मुक्तता केली. या एका प्रकरणात जरी त्याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी देखील इतर २१ प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत आहे.

रेहान कुरेशीची दिंडोशी सत्र न्यायालयाने ज्या प्रकरणात निर्दोष मुक्ताता केली आहे हे प्रकरण एका १० वर्षांच्या मुलीशी संबंधित आहे. ५ डिसेंबर २०१५ रोजी ही मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी संपूर्ण परिसरात तिचा शोध घेतला. अखेर ३ तासांनंतर ती घरी परत आली होती. या मुलीने सांगितले होते की, एक मुलगा तिला घराबाहेर भेटला होता. त्याने सांगितले होते की, तुझ्या आईने बेडशीट मागितल्या आहेत आणि यासाठी काही पैसे आहेत. मुलीने त्याला सांगितले की, मी माझ्या आईला विचारते. पण आरोपीने तिला मारहाण करण्यास आणि धमकी देण्यास सुरूवात केली.

हा मुलगा तोंड दाबून या मुलीला ओढत जवळच्या इमारतीमध्ये घेऊन गेला. याठिकाणी लाइट बंद होत्या. या मुलाने मुलीला इमारतीच्या पॅसेजमध्ये उभे राहून बेडशीटवाल्याची वाट पाहण्यास सांगितले. पाच मिनिटं घटनास्थळी वाट पाहिल्यानंतर मुलगी तिथून निघून घरी गेली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

दरम्यान, रेहान कुरेशीने ठाणे, पालघर, नालासोपारा, मुंबई आणि इतर परिसरात गुन्हे केले आहेत. रेहान सुरुवातीला ९ ते १५ वयोगटातील मुलीचा पाठलाग करायचा. त्यानंतर मुलगी घरात गेल्यानंतर दार वाजवून तो मुलीला वडिलांनी बोलावल्याचे सांगून तिला निर्जनस्थळी न्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा. अशा प्रकारे त्याने अनेक मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात रेहान कुरेशी अटकेत असून तो सध्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरोधात २२ प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT