Traffic Jam On Eastern Expressway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: जम्बो मेगाब्लॉकचा फटका! पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; मुलुंड ते भांडूपपर्यंत वाहनांच्या रांगा

Traffic Jam On Eastern Expressway: मध्य रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. लोकलऐवजी बस, रिक्षा किंवा टॅक्सी याद्वारे ते प्रवास करत आहेत. अशामध्ये मुंबईतील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या जम्बो मेगाब्लॉकचा (Central Railway Megablock) मुंबईकरांना मोठा फटका बसत आहे. मेगाब्लॉक असल्यामुळे अनेकांनी रस्ते प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुलुंड टोलनाका ते भांडूपपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुलुंड टोलनाका येथे सुरु असलेली टोल वसुली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असताना देखील मुलुंड टोलनाक्यावर टोल वसुली सुरू आहे. कॅमेरा पाहून काही क्षणांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली होती. मात्र पुनः टोल वसुली सुरू झाली आहे. यामुळे भांडूपपर्यंत वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे.

जम्बो मेगाब्लॉकमुळे आज सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लोकल उशिरा असल्यामुळे त्रास सहन करावा लागला. संध्याकाळी घरी जाताना देखील त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सीएसएमटी स्टेशन सोडले तर इतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे. काही प्रवाशांनी बस आणि एसटीचा पर्याय निवडल्याने सीएसएमटी स्थानकात रोजच्या एवढी गर्दी पाहायला मिळत नाही. काही जणांनी वर्कफ्रॅाम होमचा पर्याय निवडला आहे. रेल्वेने दुसऱ्या किंवा चौथ्या रविवारी हा ब्लॅाक घ्यायला हवा होता, असे काही मुंबईकरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बोब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसूचनेद्वारे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT