Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉक सुरू, मुंबईकरांकडे प्रवासाचे पर्याय कोणते? वाचा संपूर्ण यादी

Mumbai Local Train Mega Block Update : मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक सुरू झाला असून प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र मुंबईकरांना प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉक सुरू, मुंबईकरांकडे प्रवासाचे पर्याय कोणते? वाचा संपूर्ण यादी
Mumbai Local Train Mega Block UpdateSaam TV
Published On

मध्य रेल्वेवरील ६३ तासांच्या जम्बोब्लॉकला गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ब्लॉक ठाणे स्थानकात घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील ब्लॉकला शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेपासून सुरूवात होणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉक सुरू, मुंबईकरांकडे प्रवासाचे पर्याय कोणते? वाचा संपूर्ण यादी
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल; रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी

कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेस्थानकांवर मोठी गर्दी केली आहे. काहींना या ब्लॉकची कल्पना देखील नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, जंबो ब्लॉकमुळे नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून प्रशासनाने प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

ब्लॉक दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाबरोबरच बेस्टने विशेष सोय केली आहे. एसटी महामंडळाकडून ५० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेस्टच्या ५५ बसच्या तब्बल ४८६ हून अधिक फेऱ्या चालवल्या जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने कुर्ला, नेहरूनगर, परळ आणि दादर येथून ठाण्याकडे जाण्यासाठी ५० जादा बसेस सोडल्या आहेत. मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ बसेस चालवण्यात येत आहेत.

गरज भासल्यास आणखी काही बसेस सोडण्यात येईल, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

दुसरीकडे बेस्ट प्रशासनाने ५५ बसेसच्या ४८६ फेऱ्या वाढवल्या आहेत. कुलाबा, वडाळा, भायखळा स्थानक, दादर आदी ठिकाणांहून या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर इतर ठिकाणाहून ४३ जादा बेस्ट बसच्या २५४ अधिक फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांनी काळजी करण्याचे काम नाही, असं सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे या मेगाब्लॉकचा फायदा घेऊन टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून मनमानी भाडे घेतल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. असा प्रकार घडल्यास तत्काळ वाहतूक पोलिसांना कळवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉक सुरू, मुंबईकरांकडे प्रवासाचे पर्याय कोणते? वाचा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो लक्ष असूद्या, मध्य रेल्वेवर 63 तासांचा जम्बो ब्लॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com