मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, पुढचे ७ दिवस पाणी उकळून प्या, नेमकं कारण काय?

पिसे-पांजरापूर संकुलातील येवई जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ चे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे पाण्याच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिसे-पांजरापूर संकुलातील महत्त्वाच्या अशा येवई जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ चे दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, हा कप्पा आता कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, या दुरुस्तीच्या प्रक्रियेमुळे आणि नवीन पाण्याच्या प्रवाहामुळे येथील पाण्याच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर तात्पुरता परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा जलजन्य आजार होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पुढील सात दिवस नळाचे पाणी उकळून आणि गाळूनच पिण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.

येवई जलाशयामधून केवळ मुंबई शहरच नव्हे, तर पूर्व उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महापालिका क्षेत्रालादेखील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जातो. त्यामुळे या निर्णयाचा प्रभाव एका मोठ्या लोकसंख्येवर पडणार असून, संबंधित विभागांतील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या या सूचनेनुसार, मुंबई शहरामधील ए विभाग ज्यामध्ये नेव्हल डॉकयार्ड आणि बीपीटी परिसर येतो, तसेच बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागांतील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.

याशिवाय पूर्व उपनगरांमधील टी विभाग म्हणजेच मुलुंड पूर्व व पश्चिम, एस विभाग म्हणजेच भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व, एन विभाग म्हणजेच विक्रोळी पश्चिम व घाटकोपर पूर्व-पश्चिम, तसेच एल विभागातील कुर्ला पूर्व आणि एम पूर्व व एम पश्चिम विभागांमधील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द आणि शिवाजी नगर या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. ठाणे आणि भिवंडीमधील ज्या भागांना मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो, त्या नागरिकांनीही पुढील काही दिवस आरोग्याची विशेष काळजी घेत पाणी उकळूनच वापरण्याचे पालिकेने सुचवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे कुडाळमध्ये धरणे आंदोलन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! दिवाळीत खात्यावर पैसे जमा होणार; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

Pune MLC Election Result: पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख यांचा विजय निश्चित, भाजपच्या स्मिता जाधव यांना टाकलं मागं

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात ३० ऑक्टोबरला ₹२,००० येणार? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Lip Care: ओठ कोरडे आणि काळे पडलेत? मग घरी तयार करुन लावा 'हा' लिप बम, ओठ राहतील मऊ आणि मुलायम

SCROLL FOR NEXT