Healthy Habits : दररोज सकाळी स्वतःसाठी राखून ठेवा ३० मिनिटे; 'या' सवयी तुम्हाला ठेवतील निरोगी आणि फिट

SIMPLE HABITS TO STAY FIT AND HEALTHY : रोज दिवसाची सुरुवात जर चांगल्या सवयींनी केली आणि त्यांना आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनवले, तर केवळ शारीरिकदृष्ट्या फिट आणि निरोगी राहत नाही, तर मानसिक आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
SIMPLE HABITS TO STAY FIT AND HEALTHY
SIMPLE HABITS TO STAY FIT AND HEALTHYsaam tv
Published On: 

आपल्या आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले पाहिजे, तरच तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात उत्तम कामगिरी करू शकता. या धावपळीच्या आयुष्यात सकाळी स्वतःसाठी किमान ३० मिनिटे आवर्जून काढली पाहिजेत. या वेळेत काही चांगल्या सवयींचे पालन केल्यास तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल आणि ताणतणाव कमी होण्यासही मदत होईल.

घरातली कामे, जबाबदाऱ्या आणि वेळेत ऑफिसला पोहोचण्याचे टेन्शन... यात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. अशा प्रकारे आपण दररोज आपल्या आरोग्याला दुर्लक्षित करत जातो, परंतु २४ तासांतून ३० मिनिटे अशी नक्कीच काढता येऊ शकतात, जी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या फिट ठेवण्यास मदत करतील. जेणेकरून तुमचे आरोग्य निरोगी राहील. हे जाणून घ्या

SIMPLE HABITS TO STAY FIT AND HEALTHY
Food Safety : तोंडाला पाणी आणणारी मिठाई जीवावर बेतू शकते, चांदीच्या वर्कच्या नावाखाली पोटात जातंय विष; जाणून घ्या कसं ओळखाचं

सगळ्यात आधी करा ही कामे

बेडमधून उठल्याबरोबर लगेच मोबाईल फोन चेक करण्याची सवय सोडून द्या. यामुळे ताण वाढतो. जागा झाल्यानंतर २-३ मिनिटे आरामात बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यानंतर आरामात बसून कोमट पाणी प्या. रात्री साधारणपणे ८ ते ९ तास तुम्ही न पिता राहता, त्यामुळे सकाळी शरीराला हायड्रेट करणे गरजेचे असते. यामुळे पचनसंस्था सुधारण्यासही मदत होते.

दिवसाची सुरुवात नट्स खाऊन करा

रात्रीच १ अंजिराचा तुकडा, मनुका आणि ३-४ बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर वॉशरुमची कामे, ब्रश करणे यांसारखी दैनंदिन कामे पूर्ण करा. यानंतर बदामाची साल काढून ते खा. याचसोबत मनुका आणि अंजीरही सोबत चावून खा. ही सवय आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनवली पाहिजे. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर मनुका टाळू शकता.

SIMPLE HABITS TO STAY FIT AND HEALTHY
Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

हलकीफुलकी शारीरिक हालचाल करा

हलकीफुलकी ॲक्टिव्हिटी करणे. तुम्ही १५ मिनिटे वॉक करू शकता. सायकलिंग करू शकता किंवा स्ट्रेचिंग करू शकता. जर योगासने करत असाल तर ते आणखी उत्तम ठरते. ५ ते ८ मिनिटे श्वासोच्छवासोची व्यायाम करा. यामुळे शारीरिक आरोग्य तर चांगले राहीलच, शिवाय तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहाल.

प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता

सकाळचे जेवण म्हणजेच नाश्ता नेहमी हेल्दी असावा आणि चुकूनही तो टाळू नका. प्रोटीन आणि फायबरने भरपूर पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.

टीप: या लेखात दिलेली माहिती विविध स्रोतांवर आधारित असून ती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही आरोग्यविषयक निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com