Mumbai Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळल्याने खाली पडले, पाठीमागून आलेल्या डंपरने चिरडले; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Mumbai Accident: मुंबईतील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर दुचाकीस्वाराला डंपरने चिरडलं. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे हा दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि भरधाव डंपरने त्याला चिरडलं.

Priya More

मयूर राणे, मुंबई

जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर पवई येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा जीव गेला. खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. या अपघातामध्ये लालू गंगाराम कांबळे (५९ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी २५ वर्षीय डंपर चालकाला पवई पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.२५ च्या सुमारास हा अपघात झाला. लालू कांबळे हे अंधेरीवरून विक्रोळीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. पवईजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी भरलेले होते. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी आदळली आणि ते रस्त्यावर पडले. मागून आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी लालू कांबळे यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पवई पोलिसांनी डंपर चालक साजिद शेखविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांने आणखी एक मुंबईकराचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

लालू कांबळे यांचा मुलगा विजय कांबळे (३२ वर्षे) हा बँकेत काम करतो. लालू कांबळे हे अंधेरीमध्ये आई-वडील, बायको आणि मुलांसोबत राहत होते. विजय साकिनाका येथे जात होता तेव्हाला त्याला त्याच्या वडिलांचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त कळाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, लालू कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सक्रिय कार्यकर्ते होते. यामुळे आरपीआय पक्ष आक्रमक झाला असून जिथे अपघात झाला तिथे मोठ्या संख्येने जमून आज आरपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, कांबळे यांच्या कुटुंबाला सरकारने मदत करावी आणि मुंबईचे खड्डे पूर्णपणे बुजवावे अशी मागणी आरपीआयच्या आंदोलकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Diet Tips: वजन कमी करण्यासाठी कोणती पोळी खावी?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

अलख निरंजन! डार्क वेबवर कोड वापरून ड्रग्सची तस्करी करणारी टोळी, पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आंतरराष्ट्रीय नेक्सस

Heart Attack Risk: डायबेटीज, बीपी आणि इन्फेक्शनमुळं वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

SCROLL FOR NEXT