
बारामतीमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडलं होतं. या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. रविवारी ही अपघाताची घटना घडली होती. या अपघाताचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ट्रकच्या चाकाखाली येऊन तिघांनीही प्राण सोडले. या घटनेमुळे बारमतीमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी बारामती पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली.
बारामतीमधील महात्मा फुले चौकात हा अपघात झाला. ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी १२ वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते. ते खंडोबानगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांच्याही अंगावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातामध्ये ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या मुली गंभीर जखमी झाल्या. दोन्ही मुलींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषीत केले.
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. एका इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत या अपघाताचा थरार कैद झाला. ओंकार फळं घेऊन निघाले होते. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. ओंकार आणि त्यांच्या दोन्ही मुलींच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे की ओंकार यांना ट्रक फरफटत नेत आहे. अपघातानंतर ते जिवंत होते पण पोटावरून चाक गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. काही लोकं मदतीसाठी धावून आली खरं पण काहीच उपयोग झाला नाही. गंभीर जखमी झालेल्या ओंकार यांनी जागीच प्राण सोडले होते. तर त्यांची ४ वर्षांची मुलगी मधुरा आणि १० वर्षांची मुलगी सई यांचा देखील मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी होते. पण सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते राहत होते. ओंकार आणि त्यांच्या दोन मुलींच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला. सोन्यासारखा मुलगा आणि २ चिमुकल्या नातींचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे ओंकार यांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला. २४ तासांच्या आत चौघांचा मृत्यू झाल्यामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.