Pune Rain: पुण्यात आभाळ फाटलं! बारामती, दौंड इंदापूरमध्ये धो-धो, अनेक घरं पाण्याखाली, नीरा कालवा फुटला| VIDEO

Pune Rain Update: पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला. या पावसामुळे दौंड, बारातमी आणि इंदापूर तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे.
Pune Rain: पुण्यात आभाळ फाटलं! बारामती, दौंड इंदापूरमध्ये धो-धो, अनेक घरं पाण्याखाली, नीरा कालवा फुटला
Pune RainSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार केला आहे. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याठिकाणी सध्या धो-धो पाऊस सुरू असून नदी, नाल्यांना पूर आला आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नीरा नदीला आलेल्या पूराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. घरं- इमारतींना तडे जाऊन मोठं नुकसान झालं आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या याठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पूरात अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शहर आणि जिल्ह्यात कायम आहे. शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे. अनेक नागरिक पूरामध्ये अडले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Pune Rain: पुण्यात आभाळ फाटलं! बारामती, दौंड इंदापूरमध्ये धो-धो, अनेक घरं पाण्याखाली, नीरा कालवा फुटला
Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्त्याला नदीचे स्वरूप, बारामतीत इमारती खचल्या, NDRF दाखल

बारामती तालुक्यात कान्हेरी भागात मुसळधार पाऊस झाला. कान्हेरीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची पाहणी अजित पवार यांनी केली. कांदा पीक पूर्ण पाण्यात वाहून गेलं. शेतकऱ्यांनी सर्व परस्थिती अजित पवारांना सांगितली. यावेळी एकाने अजित पवार यांच्या पाया पडत त्यांच्याकडे विनंती केली. दादा मदत नको पण अतिक्रमण काढा, अशी मागणी या व्यक्तीने केली. तर बारामती तालुक्यात ढेकळवाडीमध्ये देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. गावातील स्मशान भूमी, कब्रसातान वाहून गेलं. गावातील रस्ता पूर्ण वाहून गेला. ऊसाच्या शेतामध्ये पूर्ण पाणी भरलं आहे.

Pune Rain: पुण्यात आभाळ फाटलं! बारामती, दौंड इंदापूरमध्ये धो-धो, अनेक घरं पाण्याखाली, नीरा कालवा फुटला
Mumbai Rain : मुंबईमध्ये पावसाचा कहर, कोसळधारामुळे रेल्वेवर परिणाम, लोकलची वाहतूक विस्कळीत

एनडीआरएफचे पथकं पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथकं बारामती आणि इंदापूरमध्ये पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. नीरा कालव्याला भगदाड पडल्यामुळे अनेक सखल भागातील रहिवासी परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पथकांना तैनात करण्यात आले आहे. नीरा कालवा फुटल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्मयात आला आहे. यामुळे शेतीचे मोठं नुकसान झालं. बारामतीमधील कारा नदी आणि इंदापूरमधील नीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बारामतीमध्ये सात तर इंदापूरमध्ये दोन व्यक्ती यांची सुखरूप सुटका करण्यात आली. सध्या, इंदापूरमधील पथक प्राथमिक बचावकार्य पूर्ण करून भिगवणमधील विश्रामगृहात थांबले आहे. दरम्यान, बारामतीमधील पथक आता सोलापूर जिल्ह्यातील एकशिव येथील मार्कड वस्तीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे.

Pune Rain: पुण्यात आभाळ फाटलं! बारामती, दौंड इंदापूरमध्ये धो-धो, अनेक घरं पाण्याखाली, नीरा कालवा फुटला
Unseasonal Rain: अवकाळीचा जोर, शेतकऱ्यांच्या जीवाला घोर, 'साहेब.. माझ्या शाळेच्या फीचं काय?' कांदा भिजल्यानं चिमुरडीला अश्रू अनावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com