BEST News  - Saam TV
मुंबई/पुणे

Saam Exclusive: पूजा खेडकरनंतर आता BEST मधील कर्मचाऱ्यांचा कारनामा; बनावट प्रमाणपत्राद्वारे ६० जणांनी मिळवले सोयीचे काम

Mumbai BEST Employee: पूजा खेडकरप्रमाणे बनावट अपंगत्वाच्या प्रमाणपत्राद्वारे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली. त्यांनी बनावट प्रमाणपत्र दाखवून बेस्टमध्ये चालक-वाहकाऐवजी सोयीचे कार्यालयीन कामे मिळवली आहेत.

Priya More

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचे प्रकरण (Pooja Khedkar) चर्चेत असताना अशाचप्रकारचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पूजा खेडकर ज्यापद्धतीने बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे आयएएस झाली त्याचपद्धतीने बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी बनावट अपंगत्वाद्वारे सोयीचे काम मिळवले. कोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. पण अद्याप चौकशी झाली नाही.

मुंबईमध्ये बेस्टमधील ६० चालक-वाहकांनी पूजा खेडकरप्रमाणे बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्राद्वारे फसवणूक केली आहे. त्यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून बेस्टमध्ये चालक-वाहकाऐवजी सोयीचे कार्यालयीन कामे मिळवली आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतरही बेस्ट प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप केला जात आहे.

२०११ मध्ये एक व्यक्ती बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीला लागला. २०१६ मध्ये लकवा झाल्याचे सांगत ही व्यक्त वैद्यकीय रजेवर गेली. वैद्यकीय रजा संपविण्यापूर्वी शासकीय वैद्यकीय मंडळाकडून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून कार्यालयीन काम मिळण्यासाठी त्यांनी बेस्टमध्ये अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाची फाइल बेस्टच्या डॉक्टरांनी मंजूरही केली. मात्र एका डॉक्टरला त्यांच्या प्रमाणपत्रावर संशय आल्याने पूनर्तपासणी करण्यात आली. त्यात या कर्मचाऱ्याने आरटीओतून लायसन्स रिन्यू केल्याचे निदर्शनास आले. पण त्यासाठी या कर्मचाऱ्याने आरटीओमध्ये स्वयंघोषित फिटनेस प्रमाणपत्रे सादर केली असल्याचे समोर आले.

अशाप्रकारे या कर्मचाऱ्याच्या बनावट प्रमाणपत्राचे पितळ उघडे पडले. या कर्मचाऱ्याप्रमाणे बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे सोयीचे कार्यालयीन काम मिळवल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी बेस्ट प्रशासन मुंबई हायकोर्टात गेले असता कोर्टाने या प्रकरणाची तत्काळ चौकशीचे आदेश दिले. पण कोर्टाने आदेश देऊन ६ महिने झाले तरी देखील अद्याप चौकशी सुरू झाली नाही. त्यामुळे या बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT