Mumbai Drugs Racket Busted by NCB in city last Night
Mumbai Drugs Racket Busted by NCB in city last Night SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Breaking News: मुंबईत NCBची मोठी कारवाई; दीड कोटींचे ड्रग्ज पकडले, अमेरिकेतून आले होते पार्सल

Nandkumar Joshi

मुंबई: मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या पथकाने धाड टाकून जवळपास दीड कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एनसीबीने एका व्यक्तीला अटक केली आहे. या तस्करीत आणखी काही लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असून, त्याने दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अटक केलेल्या आरोपीकडील मोबाइल जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये हा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. एनसीबीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी, १३ मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १.७७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मुंबई एनसीबीने ही धडक कारवाई करून दीड कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत एनसीबीच्या पथकाने विदेशी टपाल कार्यालयातून अमेरिकेतून पाठवण्यात आलेले पार्सल जप्त केले. त्यात ८५० ग्रॅम गांजा होता. मुंबईच्या ताडदेव येथे राहणाऱ्या व्यक्तीकडे तो पाठवण्यात आला होता. संबंधित आरोपीला अटक करण्यात एनसीबी पथकाला यश आले आहे. चौकशीत आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याविरोधात १० गुन्हे दाखल आहेत. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यासाठी काम करत असल्याची माहिती हाती लागली आहे.

अमेरिकेतून मुंबईच्या ताडदेवमध्ये पाठवला होता पार्सल

मुंबई एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी दुसरी मोठी कारवाई केली. या कारवाईत एनसीबीने ९२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ते पार्सलही अमेरिकेतून पाठवण्यात आले होते. फॉरेन पोस्ट ऑफिसमधून ते जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत एकूण १.७७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे. एनसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT