यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढणार; मालमत्तांची नोंद ५० वर

आयटीच्या पहिल्या टप्यात जाधव यांच्याकडे ३६ मालमत्तांची नोंद करण्यात आली होती.
Yashwant Jadhav
Yashwant JadhavSaam Tv
Published On

मुंबई : मुंबई (Mumbai) महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाड टाकली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली. आयटीच्या पहिल्या टप्यात जाधव यांच्याकडे ३६ मालमत्तांची नोंद करण्यात आली होती. अधिक तपासानंतर या मालमत्तेतवाढ होत आताही संख्या ५३ वर पोहचली आहे. त्यामुळे आता जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात होते.

Yashwant Jadhav
Sena Vs BJP: यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपची बॅनरबाजी

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अन्य काही मालमत्तांचा तपास सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच जाधव रहात असलेल्या इमारतीतील अनेक घर ही जाधवांनी विकत घेतली आहेत. याच खोल्यांच्या खरेदीतून ८० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

जाधव यांनी एका ज्वेलर्सवाल्याकडून ६ कोटींचे दागिने रोखीने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. ज्वेलर्स मालकाचे जबाब आयकर विभागाने नोंदवले असल्याची माहिती सूत्रांची दिली. सलग चार दिवस आयकर अधिकारी जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी थांड मांडून बसले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com