बीड पुन्हा हादरले! ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर, ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Crime
CrimeSaam Tv

विनोद जिरे

बीड: जीवे मारण्याची धमकी देत उसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर, ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना, बीडच्या दिंद्रुड गावात उघडकीस आलीय. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवीच्या कुमारीका पुजेसे नकार देत, हा प्रकार एक महिन्यानंतर मुलीने आईला सांगितलाय.

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील उसतोडणी करणारी एक टोळी, कर्नाटकमध्ये काम करून माजलगाव तालुक्यातील टालेवाडी तांडा येथे, 16 एप्रिल रोजी कामासाठी आली होती. येथील शिवारातील एका उसाच्या फडात, ऊस तोडणीचे काम सुरु होते. दरम्यान, ट्रॅक्टर चालक पमू कुरेने टोळीतील एका मजुराच्या अल्पवयीन मुलीवर, शेतात नेऊन अत्याचार केला.

Crime
नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगची हिऱ्याची अंगठी, मौल्यवान वस्तू चोरीला!

तसेच, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या आईला जीवे मारेल, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने याची कुठे वाच्यता केली नाही. दरम्यान मुलीच्या घरी देवीची कुमारिका पूजा आयोजित केली होती. यावेळी मुलीने पूजा करण्यास नकार दिला. याचा जाब आईने विचारला असता, मुलीने टालेवाडी तांडा येथील शेतात ट्रॅक्टर चालक पमु कुरे याने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची आपबिती सांगितली.

हे देखील पाहा-

दरम्यान पिडीतेच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत चालक पमु कुरे विरोधात तक्रार दिलीय. याप्रकरणी 376, बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, अॅट्रॉसिटी अशा विविध कलमाअंतर्गत कुरेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com