Horrific car accident on Mumbai-Nashik Highway near Kasara, three dead and two injured. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Kasara Accident : मुंबईहून निघाले अन् कसाऱ्यात काळाने घाला घातला, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू

Kasara Car Accident on Mumbai-Nashik Highway : शहापूर तालुक्यातील कसारा येथे ऑरेंज हॉटेलसमोर अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जाते

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • मुंबई-नाशिक महामार्गावर कसाऱ्यात भीषण अपघात.

  • तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी.

  • कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.

  • पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत तपास सुरू केला.

फय्याज शेख, शहापूर प्रतिनिधी

Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई नाशिक महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झालाय. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. अपघात इतका भंयकर होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, एका जणांने उपचाराला घेऊन जाताना जीव सोडला. दोन जणांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येतोय. शहापूरमधील कसारा येथे काल रात्री हा अपघात झाला. मुंबईहून कारने निघाले होते, त्यावेळी हा भयंकर अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कारवर काळाने घाला घातला. शहापूर तालुक्यातील कसारा येथील ऑरेंज हॉटेलच्या समोर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमी पैकी एकाचा रूग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.

कसारा येथे अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर भयंकर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींना तातडीने रूग्णलयात दाखल करण्यात आले. मृतदेह खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन जखमींवर सध्या जवळच्या सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT