Manoj Jarange Health : मनोज जरांगेंवर संभाजीनगरात उपचार, डॉक्टरांनी प्रकृती संदर्भात दिली महत्त्वाची माहिती

Maratha quota leader Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
Manoj Jarange Patil health Update
Manoj Jarange Patil health Update Saam TV Marathi News
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल.

  • उपोषणामुळे तब्येत नाजूक, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला.

  • दोन ते तीन आठवडे वैद्यकीय देखरेख आवश्यक.

  • रुग्णालयाबाहेर मराठा समाजाकडून जंगी स्वागत.

Manoj Jarange Patil health Update : सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपोषण सोडले. त्यानंतर ते तात्काळ रूग्णालयात उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला दाखल झाले. पाच दिवसांपासून उपोषण सुरू होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारपासून जरांगे पाटील यांनी पाणी पिणेही सोडलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. अखेर, मंगळवारी सायंकाळी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. मराठा बांधवाना घराकडे माघारी फिरण्याचे आवाहन करण्यात आले. मनोज जरांगे पाटीलही आझाद मैदानावरून थेट संभाजीनगरला रूग्णलायत उपाचरासाठी दाखल झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते मुंबईहून थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. मध्यरात्री जरांगे पाटील यांचे मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले. रुग्णालयाबाहेर मराठा तरुणांची स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्री तरुणांकडून फटाके फोडत पाटलांचे स्वागत केले. सध्या जरांगे पाटील यांच्यावर गॅलॅक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यात. उपोषणामुळं त्यांना प्रचंड थकवा जाणवतोय, तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असेही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil health Update
Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनात कुणाची घुसखोरी? आंदोलनाच्या बदनामीमागे कुणाचा डाव?

मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. येथील डॉक्टरांनी जरांगे यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिलाय. उपोषणामुळे जरांगे यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.

Manoj Jarange Patil health Update
Manoj Jarange Patil: जीआर निघाला, जरांगे जिंकले, जरांगेंच्या मुंबईतील लढ्याला मोठं यश

मागील आठवडाभरापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण झालेय. मागील दोन दिवसांपासून त्यांनी पाणीही पिले नव्हते. मनोज जरांगे पाटील रूग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांना चक्कर येत होती. पोटही दुखत होतं, असे डॉक्टरांनी सांगितले. जरांगे पाटील यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पुढील दोन ते तीन आठवडे त्यांना आराम करण्याची गरज आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Manoj Jarange Patil health Update
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या 80 टक्के मागण्या मान्य; पण त्या नेमक्या कोणत्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com