Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला? महापालिकेने घेतला मोठा निर्णय

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालावरून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही असं पत्र महापालिकेनं दोन्ही गटांना दिलं आहे. (Shivsena Dasara Melava Permission Latest News)

शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास. परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे महापालिकेने या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. दसरा मेळाव्याला महापालिकेने परवानगी नाकारल्याने दोन्ही गटांना मोठा धक्का बसलाय.

दुसरीकडे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळावा यासाठी शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली आहे. मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, हायकोर्टाच्या सुनावणीआधीच मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, हायकोर्टानेही जर परवानगी नाकारली तर शिवाजी पार्कवर घुसून दसरा मेळावा करु, असा इशारा शिवसेनेच्या वतीने याआधीच देण्यात आला होता. याशिवाय यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील मेळाव्यात केली होती. आता महापालिकेने दसरा मेळाव्याबाबत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या प्रकरणात हायकोर्ट काय निर्णय देतं याकडेचं सर्वांचं लक्ष लागून आहे.

1966 सालापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो आहे. बीएमसीनेही दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगीही दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झालाय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT